मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या विशेष ट्रेन सोडल्या जात असतानाच आता विशेष लोकलही सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बरवर १२ विशेष ट्रेन अप आणि डाऊन दिशेला सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या ट्रेन ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री कल्याण, ठाणे, कुर्ला, दादर आणि पनवेल, वाशी, मानखुर्द, दादरदरम्यान सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अंगारकीनिमित्त विशेष ट्रेनअंगारकी चतुर्थीनिमित्त पश्चिम रेल्वेची ८ व ९ डिसेंबरच्या मध्यरात्री १:३० वाजता चर्चगेट ते विरार अशी विशेष ट्रेन धावेल. ही ट्रेन चर्चगेट येथून मध्यरात्री १.३0 वाजता सुटेल व विरार येथे ३.0६ वाजता पोहोचेल.
मध्य रेल्वेच्या बारा विशेष लोकल
By admin | Published: December 04, 2014 2:53 AM