- विशेष प्रतिनिधीमुंबई - महाराष्ट्रात एकूण वाहनांची संख्या ३ कोटी १४ लाख १४ हजार ९९१ असून त्यात मोटारसायकली, स्कूटर व मोपेड यांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ कोटी ३० लाख ८ हजार ६९५ इतकी आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार ९२९ मोटार गाड्या, जीप आहेत.राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या १९७१ मध्ये ३ लाख ११ हजार ७६९ होती. आज ती ३ कोटी १४ लाखांवर गेली आहे. आज दर लाख लोकसंख्येमागे राज्यात २५ हजार ८५९ वाहने आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण केवळ ६१८ इतके होते. दर लाख लोकसंख्येमागे राज्यात आजही केवळ १२ रुग्णवाहिका आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण ०.९ इतके होते.राज्यातील अन्य काही वाहनांची आजची संख्यावाहनांचा प्रकार वाहनेटॅक्सी/कॅब्ज २९५३२१स्वयंचलित रिक्षा ७४७३३७मालमोटारी (डिझेल) १५१३६७८मालमोटारी (पेट्रोल) ९२५५रुग्णवाहिका १४९७४शाळा बसेस २२८२८ट्रॅक्टर्स ६५१०६९जोड वाहने (ट्रेलर) ४०९४६५
लाख लोकसंख्येमागे बाराच रुग्णवाहिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:14 AM