लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, डोळ्यांचा संसर्ग (डोळे येण्याच्या) तक्रारी वाढतात. गेल्या काही दिवसात रुग्ण डोळ्यांचा संसर्ग झाल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून राज्यात ६ ऑगस्टपर्यंत दाेन लाख ४८ हजार ८५१ रुग्ण असल्याची राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे.
नेत्रविकारतज्ज्ञांच्या मते दरवर्षी या काळात डोळ्याचे रुग्ण पाहायला मिळतात. यामध्ये वैद्यकीय भाषेत याला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. यामध्ये काही नागरिकांना डोळे लाल होऊन चुरचुरण्याचा त्रास झाल्याचे रुग्ण पाहावयास मिळत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या भागामध्ये डोळ्याची साथ सुरू आहे त्या भागातील शाळेतील मुलाच्या डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहे.
राज्यात सर्वाधिक डोळ्याचा संसर्ग असलेले पाच जिल्हे जिल्हा रुग्ण मुंबई १,८८२ बुलढाणा ३५,४६६ जळगाव १९,६३२ पुणे १६,१०५ नांदेड १४,०९६ अमरावती १२,२९०