पंढरपूर : पंढरीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सण उत्सवाच्या दिवशी परंपरेनुसार पेशवेकालीन पोशाख परिधान केला जातो. त्यामध्ये नवरात्र उत्सव आणि दिवाळी हे सण महत्त्वाचे आहेत. दसºयाच्या दिवशी रुक्मिणीमातेस अडीच किलो वजनाची सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तसेच शिंदे सरकार यांनी दिलेला शिंदे हार, पेशव्यांनी दिलेली मोहराची, पुतळ्याची माळ आणि सोन्याचा कंबरपट्टा यांचाही समावेश आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सण उत्सवाच्या दिवशी ज्याप्रमाणे घरातील महिला मंडळी पारंपरिक पोषाख तसेच दागदागिने परिधान करतात, तशीच पद्धत मंदिराच्या ठिकाणीही पाहायला मिळते. रुक्मिणीमातेस सोन्याच्या साडीचा पोषाख परिधान केल्यानंतर त्यादिवशी भाविकांना गाभाºयात प्रवेश असतो; मात्र केवळ मुखदर्शनच घेता येते़ पदस्पर्श दर्शन घेण्यास मनाई करण्यात येणार आहे़ सोन्याच्या साडीसोबतच रुक्मिणीमातेस मंगळसूत्र, नवरत्नाचा हार, हातातील तोडे, मत्स, बाजूबंध, नथ, कर्णफुले परिधान केले जाणार आहेत.
रुक्मिणी मातेकडे पूजेसाठी असलेल्या महिला पुजारी हेमा अष्टेकर, सुनील गुरव, प्रसाद दसपुत्रे, आनंद महादेवकर यांच्याकडून हा पोषाख केला जाणार आहे. यापूर्वी दोन महिला पुजाºयांची नेमणूक केलेली होती. त्यापैकी उर्मिला भाटे या निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे सध्या हेमा अष्टेकर या एकमेव महिला पुजारी मंदिरात कार्यरत आहेत.
नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात झाले दर्शन- नवरात्रोत्सव काळात रुक्मिणीमातेस नऊ दिवस वेगवेगळे रूप देण्यात आले होते़ त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, कमलेजा देवी, कन्याकुमारी देवी, वन देवी यांचा पोशाख परिधान करण्यात आला होता़ त्यामुळे दररोज एका वेगळ्या रूपात रुक्मिणीमातेचे दर्शन भाविकांना घेता आले. शिवाय पारंपरिक अलंकारही परिधान करण्यात आले होते़ आता दसºयादिवशीचा सोन्याचा साडीचा पोशाख हा आकर्षण ठरणार आहे़ तसेच नवरात्रोत्सवात भजनी मंडळातील महिला तसेच इतर कलाकारांना रुक्मिणी मातेस आपल्या कलेची सेवा अर्पण केली़ सलग नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रुक्मिणी सभामंडपात पार पडले़