शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

संदेसे आते है...पुण्यातून सैनिकांना जातात अडीच लाख राख्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 8:51 PM

घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते.

पुणे :    भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी              सैनिक हो तुमच्यासाठी याच ओळींना स्मरत पुणे शहराने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते. या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या सैनिक मित्र मंडळातर्फे ४० हजार राख्या यंदा सैनिकांना रवाना होत आहेत. 

    राखीपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येतेच. पण अनेकांना कामामुळे बहिणीला भेटता येत नाही. अशावेळी व्हिडीओ कॉल, फोन, मेसेजच्या माध्यमातून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र सैनिकांना प्रत्येकवेळी बहिणीशी बोलणे शक्य होतेच असं नाही. हेच लक्षात घेऊन सैनिकांना राख्या पाठवून तुम्ही आमचे रक्षणकर्ते बांधव असल्याचा प्रेमळ संदेश त्यांना दिला जातो.अगदी देशातील दीडशे बॉर्डर पोस्टवर राख्या धाडल्या जातात. सध्या शहरातील अनेक संस्था, शाळांचा त्यात समावेश आहे. त्यासोबत अनेक विद्यार्थी चित्र काढून किंवा पत्रही पाठवतात. त्यांच्या पत्रांना अनेक सैनिक उत्तरही देतात. त्यामुळे हे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. 

       रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक रेजिमेंटचे सैनिक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. तिथले पंडित त्यांना राख्या बांधतात. याबाबत सैनिक मित्र मंडळाचे आनंद सराफ यांनी लोकमतला सांगितले की, आम्हाला अनेक जण स्वतःहून राख्या आणून देतात. विविध शाळा, वृद्धश्रम, मतिमंद मुलांच्या शाळांमधूनही राख्या जमा केल्या जातात. इथून त्या पोस्टाच्याद्वारे सैनिकांना पाठवल्या जातात.या एका प्रेमाच्या धाग्याने देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानाच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारते. 

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधनSoldierसैनिकBorderसीमारेषा