शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

मुख्यमंत्री कार्यालयात अडीच लाख तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 6:01 AM

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या २० महिन्यांत विविध विभागांबाबत तब्बल २ लाख ४४ हजार १२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या २० महिन्यांत विविध विभागांबाबत तब्बल २ लाख ४४ हजार १२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या दस्तरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाबाबत आहेत. ७१ हजार ४७५ नागरिकांनी त्याबाबत अर्ज केले आहेत. त्यानंतर महसूल, नगर विकास, सामान्य प्रशासन व ग्रामीण विकास या विभागाचा समावेश ‘टॉप फाइव्ह’मध्ये आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१६ या कालावधीत फडणवीस यांच्या कार्यालयात विविध खात्यांबाबत आलेल्या तक्रारीची माहिती विचारली होती. त्यानुसार त्यांना कळविण्यात आले आहे की, २० महिन्यांत विविध ३१ विभागांत २,४४,११२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये गृह विभागाबाबत ७१ हजार ४७५, त्यापाठोपाठ महसूल व वन (२४,२९३), नगर विकास (१५,३८८), सामान्य प्रशासन (९,४६१) व ग्रामीण विकास (९,३६८) यांचा समावेश आहे. एकूण तक्रारींपैकी या पाच विभागांतील तक्रारींची संख्या ५३.२४ टक्के आहे. महिन्याला सरासरी १२ हजार २०५ तक्रार अर्ज येतात. त्याशिवाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय (६३८२), मुख्य सचिव (७२४), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (११८९), वस्त्रोद्योग आणि पणन (७७७६), रोजगार व स्वयंरोजगार (६६७), पर्यावरण (६६७), वित्त (२२८८), अन्न व नागरी पुरवठा (२८७५), उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण (३,६९३), गृहनिर्माण (८७०८) आदी विभागांत तक्रारी आल्या आहेत. रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे गेल्या १२ महिन्यांचा अभिलेख उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले असून, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत ५५ आणि १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत ५४७ तक्रारी आल्याचे नमूद केले आहे. गृह विभागासह बहुतेक विभागांतील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना तक्रार निवारण करण्याची सूचना करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. (प्रतिनिधी)