अकोला : सिव्हिल लाइन्स रोडवरील डेहनकर हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या एका महिन्याच्या बाळाच्या रक्त तपासणीचे दोन वेगवेगळे अहवाल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. हॉस्पिटल प्रशासन आणि पॅथॉलॉजीच्या निष्काळजीने हा प्रकार झाल्याचा आरोप करीत, या प्रकरणाची तक्रार बाळाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली.मनब्दा येथील रहिवासी शिवदास पाथ्रीकर यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशला दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या माउली नामक एक महिन्याच्या बाळाला सर्दी, ताप असल्याने रविवारी डॉ. मधुमती डेहनकर यांच्याकडे तपासण्यासाठी नेण्यात आले होते. डॉ. डेहनकर यांनी या बाळाला त्यांच्या रुग्णालयात दाखल करून घेतले. त्यानंतर या बाळाचे रक्तनमुने घेण्यात आले. याच भागातील डॉ. प्रशांत झामड यांच्या संभव पॅथॉलॉजीमध्ये हे रक्त तपासणीसाठी पाठविले. बाळाचा रक्तगट ह्यओ पॉझिटिव्हह्ण असल्याचा अहवाल या पॅथॉलॉजीने दिला. हा अहवाल डॉ. डेहनकर यांना दिल्यानंतर बाळावर उपचार सुरू करण्यात आले. बाळाला ह्यओ पॉझिटिव्हह्ण गटाचे रक्त देण्याची तयारी सुरू असतानाच, बाळ अस्वस्थ झाल्याचे डॉ. डेहनकर यांना कळले. त्यांनी काही क्षणातच बाळाचे पुन्हा रक्त नमुणे घेऊन, ते तपासणीसाठी डॉ. झामड यांच्या पॅथॉलॉजीमध्ये पाठविले. यावेळी बाळाचा रक्तगट ह्यबी पॉझिटिव्हह्ण असल्याचा अहवाल पॅथॉलॉजीने दिला. हा प्रकार पाथ्रीकर यांच्या लक्षात येताच, त्यांनी दोन्ही अहवाल डॉ. झामड यांना मागितले; मात्र डॉ. झामड यांनी आधी दिलेला ह्यओ पॉझिटिव्हह्ण रक्तगटाचा अहवाल चक्क फाडून टाकला, असा आरोप पाथ्रीकर यांनी केला. डॉ. डेहनकर यांना विचारणा केली असता, त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देऊन बाळावर उपचार थांबविल्याचा आरोप पाथ्रीकर यांनी केला. त्यानंतर डॉ. डेहनकर हॉस्पिटलधून निघून गेल्या, तर डॉ. प्रशांत झामड हे लॅब बंद करून गेले. दोघांशीही वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही, असे पाथ्रीकर यांनी सांगितले. बाळाची प्रकृती चिंताजनक होत असल्याने शिवदास पाथ्रीकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी हॉस्पिटलची झडती सुरू करताच बाळावर उपचार सुरू करण्यात आले. हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजीमध्ये संगनमत असून, रुग्णांची आर्थिक पिळवणूक करण्याचा हा प्रकार असल्याची तक्रार पाथ्रीकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात डॉ. प्रशांत झामड यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार केला. त्यांच्या भ्रमणध्वनीवर मेसेजही पाठविला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
एकाच बाळाचे दोन रक्तगट!
By admin | Published: March 14, 2016 1:23 AM