शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

मुंबईत विजय दोघा भार्इंचा

By admin | Published: December 31, 2015 12:34 AM

विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले, तर शिवसेनेकडून रामदास कदम यांनी आमदारकीची माळ गळ््यात घातली.राष्ट्रवादीकडून प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आधीपासूनच निवडणुक रंगत होणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी लाड यांना मतदान केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुपी युती पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना एकतर्फी विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने कदम यांना आश्वासक विजयावर समाधान मानावे लागले. यावर भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. या आधी सकाळी पालिका मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली़ अपेक्षित संख्याबळ असल्याने शिवसेनेचे रामदास कदम यांनी ८६ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीने काँग्रेसचा विजय लांबला. अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला अन्य पक्षावर अवलंबून राहणे भाग होते़ याउलट प्रस्तापित भाजपशी छुपी युती करत, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या भाई जगताप यांनी लाड यांना धुर चारली. लाड यांनी विजयासाठी सर्व शक्तीला पणाला लावली होती़ मात्र, विजयाची खात्री असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात दोन तासांनंतर ५८ आणि लाड यांच्या पारड्यात ५५ मते पडल्याचे जाहीर झाले़ भाई जगताप विजयी झाल्याचे कळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून वाजत-गाजत मिरवणूक काढली. जगताप यांची घोड्यावरून काढलेली मिरवणूक यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. महापालिकेसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे मिरवत आनंद साजरा केला. तर शिवसेनेचे रामदास कदम यांच्या पाठिराख्यांनीही घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी - भाजपची छुपी युती यावेळी उघड दिसून आली. भाजपने पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्र्यांनी जागा दिली नसली, तरी मतदानही केलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जिंकून दिले आहे.- रामदास कदम, विजयी उमेदवारहा तर मुख्यमंत्र्यांचा पराभव...मुख्यमंत्र्यांना काँग्रसेचा पराभव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. भारतीय जनता पक्ष नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण करत आली आहे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या निवडणुकीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.- भाई जगताप, विजयी उमेदवार