बेल्हा : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील गोरक्ष धोंडीभाऊ शेटे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी सकाळी ऊसतोड सुरू असताना १५ दिवसांचे २ बिबट्याचे बछडे सापडले.ऊसतोड सकाळी सुरू असताना मजुरांना या उसात २ बछडे दिसले. त्यांनी तोड थांबवून मालकाला माहिती दिली. सरपंच आशा जाधव, उपसरपंच दिलीप जाधव व इतर ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली. सरपंच आशा जाधव यांनी निमगावसावा येथील वनपाल ए. एन. सोनवणे, वनरक्षक एम. के. बनसोडे यांना माहिती दिली. ते ही या ठिकाणी लगेचच आले. वनपाल सोनवणे यांनी सांगितले, की हे दोन बछडे १५ दिवसांचे आहेत. त्या दोन बछड्यांना त्या उसातच ठेवणार असून त्यामुळे त्यांना त्यांची आई मिळेल. या भागात पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी केली आहे.(वार्ताहर)
जाधववाडीत सापडले बिबट्याचे दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 1:07 AM