शहरं
Join us  
Trending Stories
1
Abandoned matches in Test Cricket, AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द! भारतात कसोटी क्रिकेट इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं!
2
Arvind Kejriwal Bail : मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही, फाईलवर सही करायची नाही; सहा अटी घालत अरविंद केजरीवालांना जामीन
3
एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे
4
"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले
5
रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश
6
Aadhaar Card Update : तुमचं Aadhaar Card १० वर्ष जुनं आहे? त्वरित करा मोफत अपडेट; राहिलेत अखेरचे २ दिवस
7
'अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; सुनील गावसकर का, कुणावर चिडले?... वाचा!
8
ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती
9
Bajaj Housing Finance: लिस्टिंगच्या दिवशी होणार का पैसे दुप्पट? किती आहे GMP; कधी होणार लिस्ट?
10
विचारसरणीशी प्रतारणा न करणारे फक्त कम्युनिस्टच उरले; येचुरींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंचे उद्गार 
11
IND vs BAN: टीम इंडियाला 'या' ६ बांगलादेशी खेळाडूंपासून धोका, पाकिस्तानात घातला धुमाकूळ
12
CM केजरीवालांना जामीन मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "एक गोष्ट स्पष्ट झाली की...";
13
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार
14
Ganesh Chaturthi 2024: चेंगराचेंगरीत न अडकताही 'या' दोन मार्गांनी होऊ शकते बाप्पाची कृपा!
15
महायुतीला विदर्भात पुन्हा धक्का?; भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून चिंताजनक आकडेवारी समोर
16
Hindenburg Vs Adani Group: 'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले...
17
पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का
18
₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन
19
रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक
20
दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

चकली चोरीच्या संशयातून दोन मुलांची नग्न धिंड

By admin | Published: May 22, 2017 4:19 AM

दुकानातील चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दुकानदार व त्याच्या मुलांनी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करून

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : दुकानातील चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दुकानदार व त्याच्या मुलांनी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांचे मुंडण करत गळ्यात चपलांचा हार टाकून नग्न धिंड काढली. इतकेच नव्हे तर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार महमूद पठाण व त्याची दोन मुले इरफान व तौलिक यांना अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५ प्रेमनगर टेकडीतील महात्मा फुलेनगर येथे दोन्ही पीडित मुले आपल्या कुटुंबासह राहतात. नऊ वर्षांचा रोहन व आठ वर्षांचा सुरेश (नाव बदलले आहे) मित्रांसोबत परिसरात खेळत होते. त्यावेळी दुकानदार महमूद पठाण व त्यांची दोन मुले इरफान व तौलिक यांनी त्यांना बोलावून घेतले. त्या दोघांवर आपल्या दुकानातून चकली चोरल्याचा आरोप करत तिघांनी त्यांना मारहाण केली. या मुलांचे अर्धवट मुंडण करून गळ्यात चपलांचा हार घालत त्यांची परिसरातून धिंड काढली. या धिंडीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला. पीडित मुलांचे वडील बेठबेगारी, तर आई धुणी-भांडी करीत असल्याने त्यांना हा प्रकार रात्री समजला.पीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अ‍ॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टसह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिवसेना, रिपाइं, भारिप, पीआरपीसह भाजपाने या घटनेचा निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. तिघा आरोपींना अटक व पोलीस कोठडीपीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अ‍ॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टसह पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.