नाशिक : राज्यभरात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यातील प्रमुख संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण या दाम्पत्याच्या शहरातील दोन लॉकर्सची मंगळवारी (दि़१०) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली़ या लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची ६ किलो ८०० ग्रॅम सोन्याची नाणी सापडली असून, ती केबीसीत गुंतवणूक वाढविणाऱ्या एजंटांना देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़रविवार पेठेतील जानकी अपार्टमेंटमधील नगर अर्बन को-आॅप. बँकेतील लॉकरची अधिकाऱ्यांनी तपासणी केली़ यानंतर मेरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियामधील लॉकरची तपासणी केली. त्यावेळी हे घबाड मिळाले. सद्यस्थितीत ही मालमत्ता बँकेच्या लॉकरमध्येच ठेवण्यात आली असून, केबीसी प्रकरणात शासनाने नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहेत़ भाऊसाहेब चव्हाण याच्या आणखी एक लॉकरची तपासणी बाकी असून ती बुधवारी (दि़११) केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)
भाऊसाहेबाच्या लॉकरमध्ये सापडले दोन कोटींचे सोने!
By admin | Published: May 11, 2016 4:02 AM