नवी मुंबई : सावन कृपाल रूहानी मिशन, तसेच वर्ल्ड काऊन्सिल आॅफ रिलिजन्सचे अध्यक्ष संत राजिंदर सिंह महाराज २० जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये २१ व २२ जानेवारीला वांद्रे-कुर्ला कॉप्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर सत्संग व नामदान कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यासाठी देश-विदेशातून भाविक येणार आहेत. संत राजिंदर सिंहजी संपूर्ण विश्वात ध्यानधारणा अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध देशांनी शांती पुरस्कार व पाच डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. सावन कृपाल रूहानी मिशनची विश्वभर २६ हजारपेक्षा अधिक केंद्रे आहेत. मिशनचे साहित्य जगातील ५५ पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. संस्थेचे प्रमुख कार्यालय विजयनगर दिल्ली व आंतरराष्ट्रीय कार्यालय अमेरिकेतील नेपरविल येथे आहे. सावन कृपाल रूहानी मिशनच्या मुंबई शाखेच्या वतीने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानामध्ये दोन दिवसांचा सत्संग व नामदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २१ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता व २२ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता सत्संग होणार असून सायंकाळी सहा वाजता भाविकांना दीक्षा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यातून भाविक येणार असून विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. (प्रतिनिधी)
संत राजिंदर सिंह महाराजांचा दोन दिवसीय सत्संग
By admin | Published: January 19, 2017 2:41 AM