मुंबई : ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. खासगी रुग्णालयांनाही नोटा स्वीकारणे बंधनकारकसरकारी रु ग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा स्वीकारणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रु पयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र स्वत: आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी रु ग्णालयांनीही ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा पुढील दोन दिवस स्वीकारल्या पाहिजेत.शनिवार आणि रविवारी बँका चालू राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची टीम तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ज्या बँकांना मदतीची गरज असेल तेथे ही टीम सहकार्य करेल. विनाकारण गर्दी करू नका - मुख्यमंत्रीबँका आणि पोस्टामध्ये ५०० आणि १००० च्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे. यामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. वैध मार्गाने मिळविलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीघरखर्चासाठी ठेवलेले पैसे बिनदिक्कत बँकेत जमा कराजेटली म्हणाले की, गृहिणी आणि शेतकऱ्यांनी आपल्या अस्सल बचतीच्या पैशाबद्दल अजिबात काळजी करू नये. त्यांनी आपला पैसा बिनदिक्कतपणे बँकांत जमा करावा. अनेकदा घरखर्चासाठी पंचवीस-तीस हजार अथवा पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा घरात ठेवल्या जातात. अशा रकमांबाबतही नागरिकांनी काळजी करू नये. त्यांनी आपल्याकडील नोटा बँकेत जमा कराव्यात.करातून सुटका नाहीबँकेत जमा करण्यात येणाऱ्या हजार-पाचशेच्या नोटांची करांतून सुटका होणार नाही. नोटा जमा करणाऱ्यांना आयकर कायद्याचे नियम लागू राहतील, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे धांदल उडाली. भाजी, औषधखरेदी, टोलनाके, व्यावसायिक आणि पेट्रोलपंपावर ग्राहकांची अडचण झाली. हजार-पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून २.५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा बँकेत भरणा करण्यात येणाऱ्या बेहिशोबी रकमेवर नियमित कर आणि २00 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. चलनात येणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटेत कोणतीही इलेक्ट्रानिक चीप नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला.
दोन दिवस टोलमाफी, शनिवार, रविवार बँका सुरू
By admin | Published: November 10, 2016 6:22 AM