इंदापूर : ट्रक व टँकरच्या धडकेत दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. आठ प्रवासी जखमी झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वनगळी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. २७) मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंजुनाथ वैजनाथ खासमपुर (वय २८, रा. कल्लूर, ता. हुमनाबाद, जि. बिदर), अप्पासाहेब अंकुश कोल्हे (वय २६, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. मच्छिंद्र रंभाजी मस्के (वय ६०, रा. पिंबळा खुर्द, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), विनायक हनुमंत गायकवाड (वय ६५, रा. खामगाव फाटा, कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे), खेत्रू महालाप्पा गुड्डे (वय ३०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), बलभीम बसवराज नासीनोर (वय २४, रा. कल्लूर, ता. हुमनाबाद, जि. बिदर), तुक्कमा जेरफा चिकले (वय ५०, रा. कंदगड, ता. हुमनाबाद, जि. बिदर), रहमद फिशेज वाडीपाल (रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद), अशोक नीलकंठ पवार (रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), भगवान राजकुमार पाटील (वय २८, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक (केए ३९ /९५८५) ा मोहोळ (जि. सोलापूर) कडे निघाला होता. वनगळी गावच्या हद्दीत चुकीच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या टँकरने (एपी ५ /टीसी २२४७) ट्रकला समोरून धडक दिल्याने अपघात झाला. त्यामध्ये खासमपुर व टँकरचालक अप्पासाहेब कोल्हे दोघे जण जागीच ठार झाले. (वार्ताहर)
इंदापुरातील अपघातात दोन वाहनचालकांचा मृत्यू
By admin | Published: June 29, 2016 1:05 AM