बुलडाणा, दि. १९: सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी मृत्यूला जवळ केले. यामध्ये लोणार तालुक्यातील दिव्यांग शेतकर्याचा सामावेश आहे. पहिल्या घटनेत लोणार तालुक्यातील पळसखेड येथील सुदाम त्र्यंबक जायभाये (४0) या दिव्यांग शेतकर्याने सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राषण करून सोमवारी आत्महत्या केली. सुदाम जायभाये हे पायाने ५५ टक्के अधू होते. त्यांच्याकडे पाच एकर तीन गुंठे शेती होती. गत पाच वर्षांपासून सततची नापिकीमुळे त्यांच्यावर विविध बँकांचे दीड लाख रूपये कर्ज होते. कर्जाचा बोजा वाढल्याने चिंताग्रस्त सदामने रविवारी सायंकाळी विष प्राशन केले. ग्रामस्थांनी त्याला लोणार येथे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. अखेर सोमवार, १९ सप्टेबरच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान सुदाम यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. दुसर्या घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माधव लक्ष्मण टाले (३६) या शेतकर्याने १९ सप्टेंबर रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचाकडे आडीच एकर शेती असून बँकेचे २२ हजार रुपर्य कर्ज होते. माधव टाले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या
By admin | Published: September 20, 2016 12:16 AM