ठाणे : आतापर्यंत शाळेत विद्यार्थी एकमेकांशी भांडत असल्याचे नेहमीच पाहावयास मिळत असे. परंतु, ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील ४९ क्रमांकाच्या शाळेत दोन शिक्षिकांनीच एकमेकींच्या झिंज्या उपटण्याचा पराक्र म केल्याची बाब बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. या शिक्षिका विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श निर्माण करणार, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली.स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी मुंब्य्रात दोन शिक्षिका भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर हाणामारी करीत असल्याचा मुद्दा उघड केला. १ जुलैला महापालिकेच्या शाळा क्र मांक ४९ मध्ये पाटील आणि कुलकर्णी या दोन महिला शिक्षिकांनी सहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच एकमेकींच्या झिंज्या उपटण्याचा पराक्र म केला असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकच अशा प्रकारे वागत असतील तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा, असा सवाल त्यांनी या वेळी प्रशासनाला केला.तसेच याप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाने काहीच कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>चौकशी सुरूस्थायी समितीमध्ये यावर बोलताना शिक्षणाधिकारी म्हणाल्या, या प्रकरणी चौकशी सुरू असून त्या दिवशी पर्यवेक्षकही पाठवले होते. आताही कारवाई करण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन शिक्षिकांमध्ये झाली मारामारी
By admin | Published: August 06, 2016 3:16 AM