औरंगाबाद - 'एक अनार और सौ बीमार' ही हिंदीतील म्हण सगळ्यांनी ऐकलीच असेल. एकाच्या मागे अनेकजण हात धुवून लागतात. अशीच एक घटना औरंगाबादेत घडली आहे. ज्याठिकाणी एका बॉयफ्रेंडसाठी २ मुलींमध्ये भररस्त्यात मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. ज्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे.
पैठणमध्ये दोन मुली बस स्टँडजवळ एकमेकींना भिडल्या. या दोन्ही मुली एकाच मुलावर जीवापाड प्रेम करत होत्या. यातील एका मुलीने बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्या मुलीला पाहिल तेव्हा तिचा राग अनावर झाला. सुरुवातीला दोन्ही मुलींमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही मुली भररस्त्यात एकमेकींना भिडल्या. या मुलींमध्ये मारामारी झाली हे पाहताच बॉयफ्रेंडनं त्याठिकाणाहून काढता पाय घेतला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. याठिकाणी मुलींची चौकशी करून त्यांना पुन्हा घरी पाठवलं. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गेल्या बुधवारी घडली. ज्यात सकाळी सकाळी बस स्टँडवर दोन मुलींमध्ये मारामारी होत असल्याचं पोलिसांना कळालं. या दोन्ही मुलीचा बॉयफ्रेंड एकच होता त्याचवरून दोन्ही मुली एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या.
सकाळी बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीसोबत बसस्टँडवर असल्याचं कळालं तेव्हा दुसरी मुलगी त्याठिकाणी पोहचली. बॉयफ्रेंडसमोरच त्या मुलींमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्याचा बॉयफ्रेंड प्रयत्न करत होता. परंतु दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. वाद वाढतच गेला आणि दोन्ही एकमेकींना पकडून मारहाण करू लागल्या. वाढलेला प्रकार पाहून बॉयफ्रेंडनं घटनास्थळावरून पळ काढला. भरचौकात घडलेला प्रकार पाहून काहींना पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत मुलींना ताब्यात घेतले.