ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 2 - मोताळा तालुक्यातील राजूर गावात धुऱ्यावर पडलेल्या बाभळीच्या झाडाच्या कारणावरून दोन गटांत लाठ्या-काठ्यासह हाणामारी झाली. या प्रकरणी ३५ जणांविरूद्ध बोराखेडी ठाण्यात २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.राजूर गावात शेताच्या धुऱ्यावर पडलेल्या बाभळीच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटाच्या लोकांनी बोराखेडी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार महमंदखॉ बिलनखाँ रा. राजूर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी म.जाकीर म. हसन, म. बाकीर म. हसन, म. जाबीर म. हसन, म.साबीर म. हसन, बिस्मिल्लाखाँम. हसन,शे. ईलियास शे. मजीद, शे.सोहेल शे. ईनायत, शे. जावेद शे. ईनायत, शे. तौसिब शे. ईनायत, म. शब्बीर म. हसन, शे. मुनाफ शे.अमीन, शे. एजाज शे. मुनीर सर्व रा. राजूर यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर म.जाकीर म. हसन तंटामुक्ती अध्यक्ष रा. राजूर यांच्या फिर्यादीवरून हमीदखाँ बिलनखाँ, मोहमंदखॉ बिलनखाँ, युसुफखाँ बिलनखाँ, मुनाफखाँ साहेबखाँ, अलीमखाँ साहेबखाँ, इब्राहिमखाँ सरफराजखाँ, ईस्माईलखॉं सरफराजखाँ, मुजफ्फरखाँ सरफरजखाँ, अहेमदखाँ आहदखाँ, जुनेदखाँ महेमुदखाँ, राजीदखाँ महेमुदखाँ, आफीसखाँ युसुफरखाँ, आहदखाँ साहेबखाँ, नईमखाँ साहेबखाँ, वसीमखाँ हमीदखाँ, अजीजखाँ युसुफखाँ, तौसिफखाँ हमीदखाँ व इतर सहा सर्व रा. राजूर यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९,३२३, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिएसआय बोर्डे करीत आहे.
राजूर येथे दोन गटांत हाणामारी, ३५ जणांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: January 02, 2017 11:42 PM