पुणे : राज्यात उष्णतेची लाट २९ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. रविवारी परभणी, अकोला, चंद्रपूरमध्ये उच्चांकी ४७़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारी बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक चंद्रकांत मारुती हिरवे तर रविवारी मजुरी करणारे परमेवर दादाराव वाघ (४४) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्यात शनिवारपेक्षा रविवारच्या तापमानात आणखी वाढ झाली.
राज्यात अधूनमधून पूर्व मोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़यंदाच्या उन्हाळ्यात आणखी एक-दोन वेळा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ अहमदनगर, जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड येथे उष्णतेची लाट आली असून सोमवारी येथील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबादमध्ये सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रत्नागिरीत शिडकावाशनिवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे हवेत गारवा आला होता. पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : परभणी ४७़२, चंद्रपूर ४७२, अकोला ४७़२, अमरावती ४५़८, वर्धा ४५़७, यवतमाळ ४५़५, जळगाव ४५४, बीड ४५़१, अहमदनगर ४५़१, नागपूर ४४़९, नांदेड ४४़६, सोलापूर ४४३, मालेगाव ४४़२, गोंदिया ४३़६, औरंगाबाद ४३़६, पुणे ४३, उस्मानाबाद ४३, नाशिक ४२़८, सातारा ४२१, सांगली ४०, कोल्हापूर ३७७, महाबळेश्वर ३६, डहाणू ३५़७, मुंबई ३४५, अलिबाग ३३़२, रत्नागिरी ३२़७
बंगालच्या उपसागरात ‘फॅनी’ चक्रीवादळबंगालच्या उपसागरात ‘फॅनी’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्यामुळे पुढील ५ दिवस तामिळनाडु, आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फॅनी चक्रीवादळ रविवारी सकाळी चेन्नईपासून १,०५० किमी अंतरावर होते़ हे चक्रीवादळ १ मे रोजी सायंकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़