पनवेल : नवीन पनवेल येथील आदई सर्कलजवळ खांदेश्वर पोलिसांनी ३५ लाखांच्या दोन हजारच्या नोटांसह दोन किलो सोने घेऊन जाणारी गाडी पकडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्यातील तिघे नवी मुंबईचे तर तिघे पुण्याचे आहेत. तानाजी ईश्वर मेटकरे (४३, रा. कामोठे), रघुनाथ भीमराव मोहिते (३०, रा. वारजे-पुणे), संतोष सर्जेराव पवार (३०, रा. पुणे), सूर्यकांत जगन्नाथ कांडे (३८, रा. पुणे), देवाराम पुसाराम सोळंकी (३२, रा. सेक्टर ९, वाशी), खुमाराम कुलाराम चौधरी (३८, रा. सेक्टर ३, ऐरोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याचे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम छापरिया यांनी सांगितले. यातील दोन आरोपी सोनारकाम करत असल्याचे समोर आले आहे.नवीन पनवेल सेक्टर ११, १२ परिसरात चारचाकी गाडीत नव्या नोटा व सोने घेऊन काही जण येणार असल्याची माहिती छापरिया यांना मिळाली. रात्री १च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या इंडिका कार क्र . एमएच १२ के.एन. ६८८६ या गाडीतून आलेल्या सहा जणांकडे ३५ लाखांच्या दोन हजारच्या नोटांसह दोन किलो सोने सापडले. (वार्ताहर)९१ लाखांचा मुद्देमाल३५ लाखांच्या नोटा व ५५ लाख ९६ हजार रु पयांची २२५० ग्रॅम वजनाची २२ बिस्किटे असा एकूण ९१ लाखांचा मुद्देमाल खांदेश्वर पोलिसांनी जप्त केला आहे.
३५ लाखांच्या नोटांसह दोन किलो सोने जप्त
By admin | Published: December 26, 2016 5:12 AM