शहरं
Join us  
Trending Stories
1
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
2
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
5
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
6
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
7
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
8
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
9
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
10
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
11
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
12
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
13
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
14
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
15
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
17
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
18
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
19
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
20
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांच्या अपघातात २ ठार

By admin | Published: May 17, 2016 5:58 AM

ट्रेलर, ट्रक, एसटी बस आणि कार या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले

खोपोली : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी रात्री खोपोलीजवळ ट्रेलर, ट्रक, एसटी बस आणि कार या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले. अपघातानंतर एक्स्प्रेस-वेवर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.रविवारी रात्री ९ च्या सुमारास लोखंडी बीम घेवून एमएच ४६ एच ४५५० या क्र मांकाचा ट्रेलर पुणे येथून मुंबईकडे जात होता. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपोली एक्झिटजवळ आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने पुढे जात असलेल्या एमएच २० बीएल ३१९२ या एसटीला धडक दिली. यामुळे एसटीने पुढे असलेल्या ट्रक एमएच ४६ एआर ०८६४ आणि कार एमएच ०२ सीडी ४७२१ या दोन वाहनांना जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर भरधाव वेगातील ट्रेलर पुढे जावून रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रेलर चालक रोफुद्दिन शौकत अली (६१, रा. मुंबई) आणि क्लिनर आरिफ अली (२१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातात ट्रकमधील प्रवासी सुखरूप तर एसटी आणि कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद खोपोली पोलीसांत करण्यात आली.