बुलडाणा : मलकापूर बसस्थानकाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा बुधवारी रात्री जप्त केल्या. या कारवाईदरम्यान औरंगाबादमधील गारखेडा भागातील मनोहर एकनाथ कापसे या ३२ वर्षीय व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील एनआयएच्या टीएफएफसी सेल अधिकार्याच्या सुचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहर पोलिसांच्या मदतीने बसस्थानकावर सापळा रचला. या कारवाईदरम्यान एनआयएचा एक अधिकारीही उपस्थित असल्याची माहिती आहे. मनोहर कापसेकडून या कारवाईदरम्यान एक हजार रुपयांच्या १00 आणि ५00 रुपयांच्या १९0 अशा एक लाख ९५ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
मलकापुरात दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Published: January 15, 2016 1:59 AM