लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लखनऊच्या २१ जणांच्या संघटित टोळीकडून १ कोटी ७० लाखांचे साडेपाच किलो सोने जप्त करण्यात हवाई गुप्तचर यंत्रणेला यश आले. प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या झाकणातून त्यांनी ही तस्करी केल्याचेही तपासात उघड झाले. अटक आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.लखनऊची एक टोळी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरातून सोने तस्करी करून आणणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्यानुसार, त्यांनी अधिक तपास सुरू केला. सोमवारी जेद्दाह येथून जेट एअरवेजच्या फ्लाइट ९ डब्ल्यू ५२१ ने मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपास यंत्रणेने झडती घेतली. त्यामध्ये या २१ संशयास्पद आरोपींच्या सामानांची झडती घेण्यात आली, तेव्हा सोने तस्करी उघडकीस आली. या प्रकरणी जरीना बेगम, मोहम्मद जावेद अख्तर, मोहम्मद इक्बाल, फखरुद्दिन, जुनेद अहमद, मोहम्मद नईम, मोह. फहिम, मोह. इकरार, मोह. जुनेद, मोह. हारुन, मोह. नझीम, मारुफ, जिशान आलम, मोह. अशफाक, महराझुल इस्लाम,अझर अली, मोह. सोहेल, अमिरुद्दिन, जाफर इक्बाल, इशरत अली, लईक अहमद यांना अटक करण्यात आली. बाटल्यांच्या झाकणातून सोने तस्करी-आरोपींनी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणांच्या वरच्या बाजूस सोने लपवून ठेवले होते. त्यांच्याकडून १ कोटी ७० लाख किमतीचे ५ किलो ६६५ गॅ्रम सोने जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते लखनऊमधील संघटित टोळी असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यानुसार, त्यांचा अधिक तपास सुरू आहे.अन्य दोन कारवाईत २ किलो सोने जप्तदुबईतून व्हाया मस्कटवरून आलेल्या हमीद अहमद शेखकडून १ किलो ८५६ ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले. त्याने हे सोने सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवले होते. तर सुदानच्या खार्तूम शहरातील रहिवासी असलेल्या मुस्लीम यसीन मोह. अलीकडून मंगळवारी ५०० ग्रॅम सोने जप्त केले. त्याचा इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईतून वस्तूंची खरेदी करत, या वस्तू तो सुदानमध्ये विकत असल्याचे तपासात समोर आले.
पावणे दोन कोटींचे सोने जप्त
By admin | Published: May 10, 2017 2:51 AM