गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या हालेवारा पेठा जंगल परिसरात नक्षलविरोधी विशेष अभियान पथकाने दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हालेवारा जंगल परिसरात ४ सप्टेंबर रोजी नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना जहाल नक्षलवादी संजय ऊर्फ शंकर मंगू आतला (२३) व रम्मी ऊर्फ शांताबाई धोबीराम हलामी (२२) यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले आहे. प्लाटून क्रमांक ७चा सदस्य साईनाथ ऊर्फराकेश कटीया पदा (२२) व प्लाटून दलम १४ची सदस्य अरूणा नरोटे (२२) अशी त्यांची नावे आहेत.
दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक
By admin | Published: September 13, 2015 2:39 AM