सोलापूर : रेश्मा पडेकनूर खून प्रकरणातील साक्षीदार यांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पाच लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख ५० हजार रूपये घेण्याचे कबुल करून त्यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रूपये लाच स्वीकारणाºया एका पोलीसासह अन्य एका खासगी इसमास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
महेश्वर गौड-पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, बागेवाडी, जि़ विजापूर, राज्य - कर्नाटक ), मल्लिकार्जुन शिवय्या पुजारी (वय ३६, पोलीस हेड कॉन्स्टेबल) व रियाज खासिमसाहब कोकटनूर (वय ३४, खासगी इसम) अशी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, श्रीरंग सोलनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ जाधवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजयकुमार बिराजदार, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल जानराव, निलेश शिरूर, सिध्दाराम देशमुख, उमेश पवार, शाम सुरवसे आदींनी यशस्वीरित्या पूर्ण केली.