मुंबई : मुंबई : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे अनिल सोले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले. तर पुणो मतदारसंघात भाजपाचेच चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरीष बोराळकर यांचा 15 हजार मतांनी पराभव करत आपली जागा कायम राखली. पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष दत्ता सावंत, तर अमरावती मतदारसंघातून शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे आघाडीवर आहेत.
या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघ वगळता पहिल्या पसंती क्रमांकाची मते कोणालाच न मिळाल्याने दुस:या पसंतीची मते मोजण्याचे काम रात्री उशीरापयर्ंत सुरू होते.
भाजपाने गड राखला
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी जिंकून भाजपचे अनिल सोले यांनी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा गड कायम राखला. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करीत सोले यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना तब्बल 31 हजार 259 मतांनी पराभूत केले. पहिल्यांदाच राजकारणात उतरलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तायवाडेंच्या मागोमाग मते घेत राजकीय वतरुळाचे लक्ष वेधून घेतले.
पाटील, सावंत आघाडीवर
विधान परिषदेच्या पुणो पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील व दत्ता सावंत यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील यांनी नजिकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सारंग पाटील यांच्यावर 7 हजार 716 मतांनी आघाडी घेतली. चंद्रकांत पाटील यांनी 51 हजार 711 मते मिळाली. तर सारंग पाटील यांना 44 हजार 777 मते मिळाली. राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांना 32 हजार 876 मते मिळाली.
औरंगाबादमध्ये चव्हाण विजयी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा 15 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. चव्हाण यांना 68 हजार 785 ,तर बोराळकर यांना 53 हजार 643 मते मिळाली.
पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांना दुस:या फेरीअखेर 8 हजार 842, तर साळुंके यांना 6 हजार 5क्3 , राजमाने यांना 6 हजार 3क्क् मते मिळाली.
अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या 17 उमेदवांरापैकी एकाही उमेदवाराने पहिल्या फेरीत 13,क्62 मतांचा कोटा पूर्ण केला नाही. परिणामी दुस:या पसंतीच्या क्रमांकासाठी मतमोजणी करण्यात आली. तेराव्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी 1क् हजार 145 मते प्राप्त करून मतांची आघाडी कायम ठेवली. तर अपक्ष अरुण शेळके दुस:या क्रमांकावर आहेत. (प्रतिनिधी)