लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) गुरुवारी काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भ्याड हल्ला चढवून, सशस्त्र दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. मात्र या गोळीबारात मराठा लाइट इन्फँट्रीतील नाईक संदीप सर्जेराव जाधव आणि शिपाई सावन बाळकू माने या दोन महाराष्ट्रातील जवानांना वीरमरण आले. कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषेपाशी बॅटच्या सैनिकांच्या मदतीने दहशतवाद्यानंी ६00 मीटर आत घुसखोरी केली. ते घुसखोरी करीत असताना, पाकिस्तानी लष्कर व बॅटतर्फे भारतीय चौक्यांवर सातत्याने गोळीबार करीत होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या हा प्रकार घडला. भारतीय जवानांनीही बॅटच्या व पाक लष्कराच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला गोळीबारात एक जण जखमी व एक ठार झाला. नंतर जखमी दहशतवादीही मरण पावला. मात्र या आॅपरेशनमध्ये औरंगाबादचे नाईक संदीप जाधव व कोल्हापूरचे शिपाई सावन माने या दोघांना वीरमरण आले. पाकिस्तानी लष्करातील ४0 ते ५0 सैनिकांचा बॅट हा गट सातत्याने दहशतवाद्यांच्या भारतातील घुसखोरीसाठी मदत करताना आढळून आले आहे. बॅटमधील सैनिकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
राज्यातील दोन जवानांना वीरमरण
By admin | Published: June 23, 2017 3:05 AM