ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - पुणे विद्यापीठाच्या आवाारात विद्यार्थ्याने तर फर्ग्यूसन कॉलेजच्या आवारात एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मंगळवारी सकाळी घडली. या दोन्ही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी सकाळी लागोपाठ या घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.
पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेणारा बालाजी मुंडे हा विद्यार्थी सध्या नेट सेटची तयारी करत होता. मुंडे हा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी मुंडेने विद्यापीठाच्या आवारातील एका झाडावर गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याने पहाटेच गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. मुंडे हा मूळचा नांदेडचा रहिवासी होता.
पुणे विद्यापीठातील आत्महत्येची घटना ताजी असतानाच फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या आवारातही एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. परशूराम रोकडे (वय ३० वर्ष) असे या कामगाराचे नाव आहे. ते पांडवनगर परिसरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.