शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सापाच्या विषाची तस्करी करणारे दोघे अटकेत

By admin | Published: December 27, 2016 5:17 PM

एका फ्लॅटवर छापा मारून कोब्रा नाग व घोणस या अतिविषारी सापांचे विष तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली

हनुमंत देवकर/ऑनलाइन लोकमतचाकण, दि. 27 - खराबवाडी येथील सारा सिटीत आज ( 27 ) एका फ्लॅटवर छापा मारून कोब्रा नाग व घोणस या अतिविषारी सापांचे विष तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्पमित्रांच्या नावाला काळिमा फासणारी ही घटना आहे. चाकण पोलीस व वनविभागाने सर्पमित्रांच्या माहितीवरून हि कारवाई केली. फ्लॅटमध्ये ठेवलेल्या प्लास्टिक बॅरल व लाकडी पेटीतून 40 घोणस, 31 कोब्रा वनविभागाने ताब्यात घेतले असून, विष काढलेल्या तीन बाटल्या जप्त केल्या आहेत. याची किंमत बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाख रुपये आहे. सापांचे काढलेले विष उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात पाठविण्यात येत होते. हे विष 31 डिसेंबरच्या पार्टीतील नशेसाठी किंवा सापांचे इंजेक्शन बनविण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9 व 11 अन्वये आरोपी रणजित पंढरीनाथ खारगे ( वय 37, रा. ए 1/406, सारा सिटी, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि पुणे, मुळगाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली ) व धनाजी अभिमान बेळकुटे वय 30, रा. खराबवाडी, चाकण, मुळगाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा जि सोलापूर ) चाकण पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी खारगे याला 2005 मध्ये कल्याण व सांगली जिल्यातील मिरज पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल असून, तो सांगली जिल्ह्यातून तडीपार आहे. तसेच यातून निर्दोष सुटल्याचे तो सांगत आहे. आरोपी खारगे हा गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅट मध्ये राहत होता.सर्पमित्र व होमगार्ड अक्षय गजानन खोपडे याला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्याने फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे व पोलिसांना कळविले. आज रात्री एकच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष गोरी गोसावी, उपनिरीक्षक श्रीधर जगताप, महेश मुंडे, किशोर कदम, चाकण वन परिक्षेत्र अधिकारी के. एन. साबळे, वन कर्मचारी पवन आहेर, एस.एस. लवंगे, एम.एम. साबळे, प्रकाश खांडेभराड, पोलीस हवालदार संजय घाडगे, आय. जी. शेख, प्रवीण गोसावी यांनी दहा सर्पमित्रांसमवेत आज सकाळी ११ वाजता फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे, अक्षय खोपडे, दत्ता घुमटकर, गणेश टिळेकर, प्रफुल्ल टंकसाळे, मनोहर शेवकरी, विशाल बारवकर, प्रवीण कुलकर्णी, गौरव डोंगरे, श्रीकांत साळुंके, सचिन भोपे या सर्पमित्रांनी करावीत सहभाग घेऊन सर्व सर्प मोजून देण्यास पोलीस व वन विभागाला मदत केली. घरातून एक २०० लिटरचा घोणस एकत्र ठेवल्याचा बॅरल, कोब्रा ठेवलेली लाकडी पेटी, विषाच्या बाटल्या, साप पकडण्याच्या स्टिक, साप ठेवण्याच्या बरण्या, विष काढण्याच्या काचेच्या नळ्या, भांडी, ३१ नाग, ३९ जिवंत घोणस व एक मृत घोणस पोलीस व वनविभागाने जप्त केले. जप्त केलेले साप जुन्नर वन विभागाच्या व्हॅनमधून नेण्यात आले.फ्लॅटचा मालकावर होणार कारवाईएखादा फ्लॅट किंवा खोली भाड्याने देताना भाडेकरूची माहिती न घेता फ्लॅट भाड्याने कसा दिला व हा फ्लॅट कुणाच्या नावावर आहे? भाडे करार आहे का? अशी चर्चा होती. भाडेकरू ठेवताना त्याची माहिती सदर पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असतानाही माहिती न देता भाडेकरू ठेवल्याने फ्लॅटमालक विजया अशोक शिवले ( रा. भीमा कोरेगाव, ता. शिरूर, जि प. पुणे यांचेवर मुंबई पोलीस अधिनियम कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.जोखीम पत्करून कुटुंबासह राहत होताविशेष म्हणजे आरोपी रणजित खारगे हा आपली पत्नी शैलजा व दोन लहान मुलींसह या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने सोसायटीतील गेटवर सर्प मित्र म्हणून नंबर दिलेला होता, त्याने अनेक साप पकडून घरात डांबून ठेवले होते. एकदा तर त्याच्या फ्लॅटमधून एक जुळे खाली पडल्याचे नागरिकांनी सांगितले. इतके साप घरात ठेवूनही शेजारच्यांना व रखवालदाराला खबरही नाही. आरोपी धनाजी हा त्याला साप पुरवित होता, अजून किती सर्पमित्र त्याला साप पुरवित होते ते अद्याप गुलदस्त्यात आहे.३१ डिसेंबरची तयारी ?कोब्रा व्हेनम म्हणजे नागाचे विष याची पावडर करून दारू अथवा सरळ इंजेक्शन घेतली जाते. याला दिल्ली व गोवा राज्यात अधिक मागणी आहे. हेच भूत आता विद्यानगरी पुणे मध्ये उच्चशिक्षित तरुणांच्या मानगुटीवर बसले आहे. या पावडरला ङ-72, ङ-76 अशी नावे आहेत. हे विष अशा पाटर्यांमध्ये किंवा स्नेक बाईटचे इंजेक्शन बनविण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.