दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री; अशोक चव्हाणांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:47 AM2024-02-13T10:47:23+5:302024-02-13T10:47:55+5:30

त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपासूनच सुरू होती

Two-time Chief Minister, five-time Minister; Ashok Chavan's long political journey, read | दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री; अशोक चव्हाणांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, वाचा

दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री; अशोक चव्हाणांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, वाचा

नांदेड : काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपासूनच सुरू होती; परंतु स्वत: त्यांनी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. 

असा आहे अशोक चव्हाणांचा राजकीय प्रवास

२९ ऑक्टोबर १९५८ - मुंबई येथे अशोक चव्हाण यांचा जन्म 

१४ मे १९८२ : अमिता शर्मा यांच्याशी विवाह. त्यानंतर वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणात प्रवेश

१९८४ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस. 

मार्च १९८७ - नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत

१९८९ : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या लाटेत डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याकडून पराभव. 

१९९२ : शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री. 

फेब्रुवारी १९९३ : विधान परिषदेवर नियुक्ती.

ऑक्टोबर १९९९ : तत्कालीन मुदखेड विधानसभेतून ३५,०००च्या मताधिक्याने विजयी. 

२ नोव्हेंबर १९९९ :  विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री. 

सप्टेंबर २००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री. 

ऑक्टोबर २००४ : मुदखेड मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजयी. उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती. 

२००८ : राज्याचे मुख्यमंत्री 

ऑक्टोबर २००९ : नव्याने निर्माण झालेल्या भोकर मतदारसंघातून १ लाख मतांनी विजयी. 

नोव्हेंबर २००९ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री.

मे २०१४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातून ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी.

२०१० : आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. 

जानेवारी २०१७ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड.

मे २०१९ : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून ४२ हजार मतांनी पराभव. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

ऑक्टोबर २०१९ - भोकरमधून  ५२,००० मतांनी विजय. 

५ डिसेंबर २०१९ : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री

२०२२ - शिंदे गटाची बंडखोरी आणि ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपद गेले. 

१२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा.

Web Title: Two-time Chief Minister, five-time Minister; Ashok Chavan's long political journey, read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.