शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

भामटेत चिमुकल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 3:59 PM

भामटे (ता. करवीर) येथे  दोन सख्या भावांचा गाव तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील (वय ८) व राजवीर महादेव पाटील (वय ६)अशी या चिमुखल्यांची नावे आहेत.

प्रकाश पाटील

कोपार्डे -

भामटे (ता. करवीर) येथे  दोन सख्या भावांचा गाव तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील (वय ८) व राजवीर महादेव पाटील (वय ६)अशी या चिमुखल्यांची नावे आहेत. ही घटना सकाळी साडे आकराच्या दरम्यान घडली. अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी समर्थ व राजवीर यांची आजी शांताबाई पाटील या दररोज गावा जवळ असणाऱ्या वाघजाई डोंगरावर जनावरे चरण्यासाठी घेऊन जातात. जनावरे परत घेऊन येण्याच्या वाटेवरच गावतळे आहे. तिथे समर्थ व राजवीर आजीची वाट पाहत बसत असत.आज ११ च्या दरम्यान आजी शांताबाई जनावरे घेऊन डोंगरातून घरी येताना याच गावतळ्यात जनावरांना पाणी दाखवण्यासाठी गेल्या होत्या. आजीच्या मागून समर्थ व राजवीर तळ्याजवळ गेले होते. 

जनावरांना पाणी दाखवून शांताबाई या घरी परतताना समर्थ व राजवीर दोघांनाही घरी बरोबर चला म्हणून दटावून घेऊन आल्या. जनावरे पुढे पळत सुटल्याने शांताबाई पुढे आल्या. समर्थ व राजवीर यांनी डोळा चुकवून गावतळ्यात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी तळ्यावर कोणी नव्हते. समर्थला थोडे फार पोहता येत होते पण राजवीरला पोहता येत नव्हते. आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर राजवीर पाण्यात खोल पाण्यात बुडताना समर्थने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असावा.पण दोघेही खोल पाण्यात गेल्याने समर्थसह राजवीर ही पाण्यात बुडाला असावा.दरम्यान समर्थ व राजवीर दोघेही बराच वेळ घरी आले नाहीत म्हणून या दोघांच्या आई व आजीने चुलत भाऊ अथर्वला पाठवून दिले. यावेळी तळ्याच्या काठावर कपडे दिसले पण समर्थ आणि राजवीर नसल्याचे घरी सांगितले. वडील महादेव चुलता व आईतळ्यावर आले.पण दोघेही दिसत नसल्याने पाण्यात शोध घेण्यास सुरुवात केली. चिवकाटी व गळाच्या साहाय्याने शोधाशोध केली. तळ्याच्या खोल भागात ग्रामस्थांना दोघे बुडालेले सापडले.प्रथम उपचार म्हणून दोघांच्याही पोटातील पाणी काढून उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा पुर्वीच समर्थ व राजवीर णा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.दोन सख्या चिमुखल्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच गावावर शोककळा पसरली. नातेवाईकांनी आई,वडील चुलते,चुलती व आजीने हंबरडा फोडल्याने ह्रदय पिळवटून टाकणारे चित्र होते. होता.