ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या टी.वाय.बीकॉमच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार, २४ जून रोजीच जाहीर होणार असून हा निकाल पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
टीवायच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावर मुंबई विद्यापीठाच्या नावे काही वेळापासून एक खोटा जीआर (पोस्ट) सोशल मीडियावर फिरत असून टीवायचा निकाल आजऐवजी ३० जूनला जाहीर होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र ही पोस्ट खोटी असून निकाल पुढे ढकलण्यात आल्याची अफवा आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून टीवायचा निकाल ठरल्याप्रमाणे आज म्हणजेच २४ जून रोजी रात्री उशीरा जाहीर होईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.