रोहा : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील खाजणी गावातील एका महिलेला ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याच्या प्रकरणाने वादाचे टोक गाठले होते. संबंधित महिलेने अखेर आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविल्याचे उदाहरण ताजे असतानाच भालगाव विभागातील हाळ या गावात ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याची तक्र ार रामदास नथुराम पानसरे यांनी दिली आहे. या प्रकरणात एकूण ४१ जणांविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास नथुराम पानसरे (४९, रा. हाळ) यांच्या मालकीच्या जागेत दोन बंधारे व तीन रस्त्यांचे काम केले आहे. याबाबत पानसरे यांनी न्यायालयात दावा दाखल केला असून या गोष्टीचा राग मनात धरून सखाराम विठोबा पानसरे यांनी धमकावले आहे. या प्रकरणी नारायण पानसरे, नामदेव पानसरे, नावजी पवार, शांताराम निकम, लक्ष्मण पानसरे, प्रफुल्ल पाटील, परशुराम म्हात्रे, महादेव पानसरे, नितेश म्हात्रे, तुकाराम बैकर, मारुती धुमाळ, दिलीप बैकर, महादेव निकम, जितेश निकम, रोहिदास धुमाळ, हिरू तटे, रामदास भगत, नारायण तटे, एकनाथ म्हात्रे, नथुराम निकम, यशवंत पानसरे, दीपक पानसरे, दामोदर तटे, राजेंद्र भोईर, संदीप भोईर, सुरेश आकलेकर, भगवान पानसरे, नारायण पानसरे, प्रकाश पानसरे, तुकाराम तटे, तुकाराम म्हात्रे, गंगाराम पानसरे, रामचंद्र तटे, मधुकर पानसरे, बाळकृ ष्ण पानसरे, हरिदास पानसरे, केशव टावरे, गणपत डाके, मारुती म्हात्रे, रामदास म्हात्रे अशा एकूण ४१ आरोपींविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१६० कुटुंबे असलेल्या या गावात होळीनंतर पाणीटंचाई असते. यासाठी संपूर्ण गावाची पाण्याची तहान भागविण्यासाठी गावालगत असणाऱ्या ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून बंधारे करण्यात आल्याचे यापैकी काही ग्रामस्थांनी सांगितले आहे. या तक्रारीबाबत पोलीस निरीक्षक निशा जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)
हाळ गावात वाळीत टाकण्याचा प्रकार
By admin | Published: September 19, 2016 5:20 AM