शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

उदयनराजेंची पंतांसोबत खलबते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:31 AM

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीला राष्ट्रवादीतून सुरुवातीपासूनच विरोध आहे. तरीही सलग दोन टर्म उदयनराजे राष्ट्रवादीतून खासदार झाले. आता पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी बोहल्यावर चढून अक्षता टाका म्हणणाºया उदयनराजेंना राष्ट्रवादीतून विरोध होत आहे. उदयनराजेंनी मात्र दबावतंत्राचा पुरेपूर वापर केला आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार परिवर्तन यात्रेसाठी कºहाड, रहिमतपूर व फलटणमध्ये फडणवीस सरकारविरोधात रान पेटवत असताना उदयनराजे मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत खलबते करण्यात गुंतले होते.सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती, तर जिल्ह्यातील विकासकामांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी दिली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताºयात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. दोन राजे एकाच गाडीतून एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्याने पुन्हा मनोमिलन झाल्याचा भास अनेकांना झाला. ‘राष्ट्रवादीकडून आता तिकीट फायनल,’ असे वक्तव्य साताºयातील कार्यकर्ते छातीठोकपणे सांगू लागले असतानाच उदयनराजेंनी वेगळीच ‘मूव्ह’ घेतली. राष्ट्रवादीचा विस्कटलेला पट सरळ करून उदयनराजेंच्या पाठीमागे प्याद्यांची गोळाबेरीज करण्याचे प्रयत्न दस्तूरखुद्द खासदार शरद पवार करीत असतानाच उदयनराजेंनी मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उदयनराजेंनी भाजपामध्ये यावे, ही फडणवीसांची जुनी इच्छा आहे. कुठलेही निमित्त काढून फडणवीस ती उदयनराजेंच्यासमोर व्यक्त करत असतात. या बैठकीतही त्याचे ‘रिपिटेशन’ झाले असण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी फेटाळली आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा