शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 12:08 AM

गाड्यांची तोडफोड; मानकुमरे यांच्या पत्नीसह पोलिस जखमी; आज जावळी तालुका बंद

मेढा/सायगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास खर्शी बारामुरे, ता. जावळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे यांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर मानकुमरेंच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, आपल्या पत्नीसह कार्यकर्त्यांनाही उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्राला भेट देण्यासाठी जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते परतत असताना उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडे रागाने पाहिल्याचे सांगत संबंधिताने मानकुमरे यांच्या एका कार्यकर्त्याला दांडके घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी उपस्थित असलेले मानकुमरे पुढे सरसावले, तेव्हा बाचाबाचीत एक कार्यकर्ता मानकुमरे यांच्यावर दांडक्याने मारहाण करणार तोच त्यांच्या पत्नी जयश्री मानकुमरे मध्ये पडल्या. यावेळी त्या व त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले.त्यानंतर मानकुमरे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांभोवती जमला. शेजारी असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यातून दगडे उचलून गाड्यांवर भिरकाविण्यास प्रारंभ झाला. या दगडफेकीत पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर) शिवेंद्रसिंहराजे मेढ्यात तळ ठोकून!या घटनेची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करहर पोलिस ठाण्यात येऊन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचे आवाहन केले. या घटनेची माहिती काही क्षणात संपूर्ण जावळी तालुक्यात पसरली. त्यामुळे शेकडो कार्यकर्ते करहर पोलिस ठाण्यापुढे जमा झाले. त्यामुळे याठिकाणीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिस मुख्यालयासमोर उदयनराजेंच्या समर्थकांची गर्दी !खर्शी येथे खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे समजताच साताऱ्यात पोलिस मुख्यालयावर खासदार समर्थक मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. संतप्त कार्यकर्त्यांचा आवेश पाहून पोलिसांनीही मुख्यालयासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उदयनराजे यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन मानकुमरेंवर तत्काळ कारवाईची मागणी केली.खर्शी येथे खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे समजताच साताऱ्यात पोलिस मुख्यालयावर मंगळवारी रात्री खासदार समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.