सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणा-या मोर्चाचे नेतृत्व साता-याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे.मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणा-या मराठा क्रांती मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करुन २१० जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उदयनराजे व संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे राहतील, अशी माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला. लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी थेट मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे.
मराठा मोर्चाचे नेतृत्व उदयनराजे, संभाजीराजेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:47 AM