शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मोठी घडामोड! दिल्लीत उद्धव-मोदींची खलबतं, राज्यात फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग; भाजप नेत्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 12:28 PM

मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तासाभरापासून खलबतं सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत. पंतप्रधानांसोबत बैठक सुरू असताना राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू असतानाच राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, फडणवीसांनी बोलावली बैठक ही पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी काहीही संबंध नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चांगलच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही दरेकर म्हणाले. 

दिल्लीत तासाभरापासून खलबतंदिल्लीत पंतप्रधान नरेंद मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, जीएसटी थकबाकी आणि तौत्के वादळाच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निवेदनाद्वारे जीएसटीची थकबाकी राज्याला तातडीनं द्यावी यासंदर्भात मागणी केल्याचं सांगितलं  जात आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा