मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून काही बोलाल तर कारवाई करु, असा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेळगावला जाण्याचे टाळले, अशी चर्चा शिवसेनेच्याच वर्तुळात सुरु आहे. आक्रमकतेचे ‘बाळकड’ू शिवसेनाप्रमुखांकडून मिळालेले असल्याने खरेतर ठाकरे यांनी बेळगावला जाऊन पोलीसी आदेश धाब्यावर बसवायला हवे होते, अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती.बेळगाव नाट्यसंमेलनाच्या नगरीस बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी असे नाव दिले गेले. सीमाप्रश्न हा शिवसेनाप्रमुखांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या उदघाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तर समारोपाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय संमेलनाच्या आयोजकांनी खुद्द ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेतला होता. मात्र ऐनवेळी पोलिसांनी २१ अटी घालून नाट्य संमेलनास परवानगी दिली. त्यामध्ये सीमा प्रश्नाचा ठराव मांडूनये, कर्नाटक सरकार विरोधात घोषणा देऊ नये, कन्नड-मराठी भाषिकांत तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये आदी अटींचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)
कारवाईच्या भीतीने उद्धवची दांडी?
By admin | Published: February 09, 2015 5:39 AM