शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 4:13 PM

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

मुंबई - नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात सत्ताधारी भाजपाने या प्रकारावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत आमची युती होती तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि प्रत्येकवेळी निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर तिकडे जय बजरंग बली करायचे, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप भाजपावर करत आता स्पष्ट आणि एकाविचाराने पुढे जाण्याची गरज आहे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला.  

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

...त्याआधी गोवंश हत्याबंदी करासमान नागरी कायद्यावर आमचा आक्षेप नाही. या कायद्याने फक्त मुस्लिमांना त्रास होईल म्हणून ते आणत आहेत. आम्ही पाठिंबा देऊ. पण या कायद्याने हिंदूंना त्रास होणार की नाही हेदेखील लोकांसमोर ठेवावे. समान नागरी कायदा आणण्यापूर्वी गोवंश हत्याबंदी कायदा काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत करा. त्रिपुरात गोवंश हत्याबंदी नाही. समान नागरी कायद्यात गोवंश हत्याबंदी कायदा असणार की नाही? समान नागरी कायदा प्रत्येक गोष्टीत व्हायला हवी. कायदा समान ठेवायचा मग त्यांच्यावरील नेत्यांवर झालेले आरोप त्याची चौकशी का होत नाही. कायदा समान ठेवा असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर आरोप केले.  मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होतात पण महिला मंत्री होत नाही. हे कुठले राज्य आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा