शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 5:30 PM

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई : टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू  नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरज चोप्राचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. मुंबईत त्याचे भव्य स्वागत होणार आहे, अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली. 

याचबरोबर, मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी सांगितले. हरयाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे. 13 ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. त्यामुळे गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी इतिहासात आतापर्यंत झाले नाही, असे सेलिब्रेशन करणार असल्याचे  नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, कुटुंबीयांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितले.

महाराष्ट्राशी नाते! नीरज चोप्रा याने टोकिओत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोपडे यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेतीव्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.

सुवर्ण उत्सव! नीरजने इतिहास घडवला!तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारतासाठी हा दिवस सुवर्ण उत्सवी ठरला. दुसरीकडे कुस्तीत सुवर्ण पदकाची संधी हुकल्यानंतर बजरंग पुनियाने कांस्य पदकावरील पकड अजिबात ढिली केली नाही. यामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस अत्यंत जल्लोषाचा ठरला. 

नीरजने इतर खेळाडूंना दिली नाही एकही संधीअंतिम फेरी   सहापैकी दुसरा प्रयत्न सर्वोत्तमपहिला     ८७.०३ मीटरदुसरा    ८७.५८ मीटरतिसरा    ७६.७९ मीटर चौथा    फाऊलपाचवा    फाऊलसहावा    ८४.२४ मीटर

ऐतिहासिक कामगिरी २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने बिंद्राच्या कामगिरीशी बरोबरी करताना तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा भारतीय ठरला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्राMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा