मुंबई'कर' म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दरम्यान, यानंतर भाजपनं यावर टीका करत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे की फक्त मुंबईचे असा सवाल केला आहे. भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारले आहेत.
"मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही?, इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस राहत नाहीत का?, मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात?," असे सवाल उपाध्ये यांनी केले आहेत.