शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

"बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली"; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 8:18 AM

"भाजपने चालविलेले ‘ऑपरेशन लोटस’देखील कर्नाटकातील जनतेने चिरडून टाकले", सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १३६ जागा जिंकून भाजपचा दारूण पराभव केला तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावे लागले. याच दरम्यान ठाकरे गटाने भाजपा आणि मोदी सरकारवर निकालावरून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली" असंही म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 

"बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. पुन्हा भाजपने चालविलेले ‘ऑपरेशन लोटस’देखील कर्नाटकातील जनतेने चिरडून टाकले. भाजपने सत्तेसाठी फोडलेल्या 18 आमदारांपैकी बहुतेकांना जनतेने आता घरी बसविले आहे. भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही! कर्नाटकात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच होईल" असं देखील म्हटलं आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख

- कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 65 या आकडय़ावरच लटकला. 

- कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून भाजपकडून दक्षिणेतले एकमेव राज्य हिसकावून घेतले. देशात 2024 साली काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव ठरलेलाच होता. मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली. 

- मोदी व शहांचा प्रचार व त्यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता. मोदी-शहा या जोडगोळीने आधी ‘हिजाब’चा विषय चालवला, तो फसला. काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीची भाषा करताच मोदी वगैरेंनी ‘हा बजरंग बलीचा अपमान आहे,’ अशी बोंब ठोकून प्रचारात बजरंगबलीस उतरवले. काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. 

- मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. 

- काँग्रेसने भाजपच्या धोरणांवर, महागाईवर, गॅस सिलिंडरच्या भाववाढीवर भर दिला. कर्नाटकात महिलांनी काँग्रेसला मतदान केले याचे कारण महागाई व प्रियंका-राहुल गांधींचा प्रचार. लोकांना बजरंगबली, हिजाबपेक्षा त्यांचे जीवनावश्यक मुद्दे महत्त्वाचे वाटतात. मोदी व शहांच्या धार्मिक मुद्दय़ांना महत्त्व न देता कर्नाटकने देशाच्या व राज्याच्या प्रश्नांना महत्त्व देऊन निकाल दिला हे महत्त्वाचे.

- भाजपने सत्तेसाठी फोडलेल्या 18 आमदारांपैकी बहुतेकांना जनतेने आता घरी बसविले आहे. तेव्हा ‘ऑपरेशन लोटस’ घडवून, धमक्या देऊन, धर्मांध प्रचार करून, ईडी, सीबीआयचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावून निवडणुका जिंकण्याचे दिवस आता गेले आहेत. सामान्य माणूस हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट केले.

- कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

- मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस कर्नाटकात जेथे जेथे गेले तेथे भाजपचा पराभव झाला. संपूर्ण सीमाभागात एकीकरण समितीच्या पराभवासाठी भाजपने मराठी बेइमानांच्या फौजा घुसवल्या. एकीकरण समितीचे उमेदवार पाडले, पण भाजपचा पराभव झाला. विषय राहिला उत्तरेचा. उत्तर प्रदेश वगळता देशातील बहुतेक राज्यांतून भाजपचे उच्चाटन झाले आहे, ते लोकसभेतही होईल. 

- उत्तर प्रदेशात भाजप जिंकलाच (ती शक्यता कमी) तर त्याचे श्रेय योगी महाराजांना जाईल व उत्तर प्रदेशचे भाजप खासदार विरोधी बाकांवर बसतील. त्यांच्या जोडीला फार तर गुजरात असेल, उत्तर प्रदेश व गुजरातच्या पलीकडचा भारत मोठा आहे व त्या भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही! कर्नाटकात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच होईल. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा