शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

"एका महिलेला सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवले, राज्यात झुंडशाहीचं सरकार"; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:20 PM

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही, तर मग पाकिस्तानात म्हटली जाणार का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एका महिलेला हे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुंबईत काल घडलेली गोष्ट मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथं येतात. ते सांगतात की बाहेर ७०-८० गुंड आहेत. त्यांच्याकडून हल्ला केला जाऊ शकतो. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतच झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन होतं किंवा ते इतके नाकाम झाले आहेत की त्यांना दबावामुळे काहीच करता येत नाही, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला. कालच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा राज्यात कुणीही सुरक्षित नाही हे सिद्ध होईल. जर झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीला पोलीस सुरक्षित बाहेर काढू शकत नाहीत. पोलिसांसमोर दगड मारले जाणार असतील तर मग अशाप्रकराचं झुंडशाही सरकार मी पाहिलेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. 

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि आमचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे