छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. नुकतेच पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. स्वामी यांच्यासोबत पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनीही सोडचिठ्ठी दिली आहे.
पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश
पक्षात मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करून विश्वनाथ स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
शिवा लुंगारे - उपजिल्हाप्रमुखप्रकाश अत्तरदे - माजी नगरसेवकसाहेबराव घोडके - ज्येष्ठ शिवसैनिक राजू खरे - ज्येष्ठ शिवसैनिकसुदाम देहाडे - विभागप्रमुखनागनाथ स्वामी - विभागप्रमुखरोहिदास पवार - शाखाप्रमुखप्रकाश हांडे - उपविभाग प्रमुखशिवशंकर स्वामी - उपशाखाप्रमुखमनोहर विखणकर - गटप्रमुखअजिंक्य देसाई - गटप्रमुखपंतू जाधव - गटप्रमुखमनोज नर्बदे - शिवसैनिकअनंत वराडेवसंत देशमुखसुभाष नेमानेरमेश गल्हाटेगौतम भारस्करविठ्ठल सोनवणेतुकाराम घोडजकररवी बनकररोहित स्वामी - युवासेना उपशहरप्रमुखराहुल पाटील - उपशाखाप्रमुखयोगेश चौधरी - उपशाखाप्रमुखबाबू स्वामी - गटप्रमुखआकाश बिडवे - युवासेनानिखिल पडूळ - युवासेनाचैतन्य जोशी - युवासेनाऋषिकेश भालेराव - युवासेनातुषार पाथ्रीकर - युवासेनामयुरेश जाधव - युवासेनारोहन स्वामी - युवासेनासूर्यकांत मानकापे - युवासेनाआयुष शेडगे - युवासेनासर्वज्ञ पोफळे - युवासेना
सोमवारीच एकनाथ पवारांनी दिला राजीनामा
ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी सुषमा अंधारे, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत पक्ष सोडला आहे. एकनाथ पवार यांनी नांदेडमधल्या लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. माझ्या पक्षातील काही लोकांनी पराभूत करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि आज छत्रपती संभाजीनगरमधील शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे.