शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
2
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
3
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
4
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
5
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
6
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
7
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
8
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
9
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
10
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
11
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
13
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
14
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
15
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
16
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
17
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
18
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
19
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
20
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?

“अमृता फडणवीस शुद्ध आणि पवित्र पण..,” ‘त्या’ प्रकरणावरून ठाकरे गटानं केलं फडणवीसांना टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 9:17 AM

या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे, असं म्हणत ठाकरे गटाकडून जोरदार टीका. 

‘फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात असताना तुम्ही राजकीय विरोधकांचेच काटे काढणार असाल तर काट्याने काटा काढण्याचे तंत्र इतरांनाही अवगत आहे,’ असे म्हणत ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा बाण सोडला.

'अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी सौ. अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी?’ असा सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आलाय.

काय म्हटलेय संपादकीयमध्ये?‘लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. ‘एलआयसी’चे मुख्यालय मुंबईत मंत्रालयासमोर आहे. अदानीच्या नादी लागून एलआयसीने जनतेच्या पैशाची लूट केली व आता विरोधकांनी ‘एलआयसी’च्या दरोडेखोरीवर आक्षेप घेतला म्हणून ‘योगक्षेम’सुद्धा मुंबईतून हलवला जाईल,’ असे त्यात नमूद करण्यात आलेय.

कायद्याचे राज्य कोसळतेयया राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली असल्याचे म्हणत संपादकीय मधून निशाणा साधण्यात आलाय.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र