शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 9:31 AM

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या बोलण्यातून डॉक्टरी, वैद्यकीय ज्ञान दिसत आहे. हे ज्ञान आलं कुठून या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत दिलं आहे.

मुंबई -  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना युद्धाची सविस्तर माहिती ही जनतेसमोर मांडली आहे. कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. तिसरे महायुद्ध समजा. संपूर्ण जग विषाणूशी लढत आहे. गाफील राहून चालणार नाही. लोकांचे प्राण वाचवणे हेच महत्त्वाचे आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या बोलण्यातून डॉक्टरी, वैद्यकीय ज्ञान दिसत आहे. हे ज्ञान आलं कुठून या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत दिलं आहे. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)

'वैद्यकीय शास्त्र हा अगदी लहानपणापासूनच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहीलेला आहे. डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 'होमिओपॅथी कनेक्शन' सांगितलं आहे. "लहाणपणी एक प्रश्न लहान मुलांना नेहमी विचारला जायचा की मोठा झाल्यावर तू कोण होणार? त्यावेळेला मुलं आपापली इच्छा व्यक्त करायची. अर्थात प्रत्येक जण त्याकाळी दिलेल्या उत्तराप्रमाणे घडलाच असेल किंवा घडला नसेलही पण माझ्यासाठी म्हणाल तर वैद्यकीय शास्त्र हा अगदी लहानपणापासूनच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहीलेला आहे. अगदी त्या काळात माझ्या मनात एक शक्यता अशीही डोकावत होती की, डॉक्टर व्हावं. अर्थात नाही झालो ते बरंच झालं. हो पण डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्नही मी कधी केला नाही. पण मी मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास मात्र जरूर करत होतो" असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

"आमच्याकडे औषधांचा एक बॉक्स असायचा. त्यात आता जे खूप वापरलं जातं ते आर्सेनिक आल्बम वगैरे अनेक औषध असायची. कोणाला बरं नाही असं वाटलं तर घरच्या घरी उपचार केले जायचे. तेव्हा होमिओपॅथीचे डॉक्टर्सही आमच्याकडे यायचे. अ‍ॅलोपथी हा विषय त्यावेळी खूप दूर होता. तो काळ एकूणच वेगळा होता. आतासारखे सगळे उपद्वापी व्हायरस नव्हते. त्या काळात असे त्रासदायक व्हायरस नव्हते. एक छान चांगलं आयुष्य होतं. त्या काळात मी होमिओपॅथीचा अभ्यास करत होतो. कळत नकळत ती जी आवड होती ती आजही थोडीफार जिवंत आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं आहे. "सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाही, तोंडावर मास्क लावून फिरता. तोंडाला हात लावत नाही. हात सतत धुताय. तोपर्यंत काळजीचं कारण नाही. हे कोरोनासोबतचं जगणं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच संपूर्ण यंत्रणा हे कोरोनाचं युद्ध लढतेय. मला काम करायचंय आणि जनतेला वाचवायचंय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना