मातोश्रीवर हल्ला करण्याची धमकी देणारे कोणते तरुण होते? काय होते? हे मला माहित आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची भाषा करणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नाव घेतली. या देशामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचे, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, असा आरोप ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
याचबरोबर ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊट फुल सरकारची नाही. ते सुडाने पेटलेले सरकार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढून घेतलेले आहे, त्यामुळे भविष्यात काही घडले तर याची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची असेल, असेही राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्या चार वाजता वरळी येथे उद्धव ठाकरे आणि काही कायदेपंडितांची पत्रकार परिषद आहे. राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे, त्यासंदर्भात खुली चर्चा होईल. आपण सर्वांनी तिथे यावे, असेही ते म्हणाले.
खऱ्या जागेपासून चार किमीवर राम मंदिर...भाजपचा नारा होता, मंदिर वही बनाएंगे. पण ज्या ठिकाणी मंदिर बांधायची चर्चा होती, त्या ठिकाणी मंदिर बांधले गेले नाही. ज्या ठिकाणी राम मंदिर बनवायचे होते, त्या ठिकाणाहून चार किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधण्यात आले आहे. ती जागा अजूनही तशीच आहे, अशी टीका राऊत यांनी केली.