मुंबई-
एकाबाजूला सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं अखेर स्वीकारला आहे. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध होता. तरीही कोर्टानं रिपोर्ट स्वीकारुन पाटणकर यांना मोठा दिलासा दिला आहे.
ईडीने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात ८४.६ कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. याप्रकरणी ईडीनं कारवाई करत श्रीधर पाटणकर यांची साडे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती. पण ईडीच्या विरोधानंतरही काल विशेष सीबीआय कोर्टानं सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.