शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Uddhav Thackeray Resigns: काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 9:25 AM

Uddhav Thackeray Resigns: राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

Uddhav Thackeray Resigns: राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंसारख्या प्रबळ नेत्यानं बंडाचं निशाण फडकावल्यामुळे शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. संयमी नेतृत्व म्हणून गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं गेलं. काल उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आणि राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्याच पक्षातील निष्ठावंत नेत्यांनी साथ सोडल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आलेली असतानाही अजिबात चीडचीड न करता अत्यंत संयमी असं उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण होतं, अशा प्रतक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. 

राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

उद्धव ठाकरेंनी भाषणात दाखवलेल्या संयमी आणि शांतपणाचं सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच आपल्या पक्षप्रमुखावर नामुष्की ओढावल्यामुळे आक्रमक शिवसैनिकांची समजूत काढणं आणि रस्त्यावर न उतरण्याचं आवाहन करणं याबद्दलही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं सोशल मीडियात स्वागत केलं जात आहे. काहींनी तर आपल्या विरोधात परिस्थिती असल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्यावर देखील निरोपाचं भाषण कसं असावं याचं उद्धव ठाकरेंच कालचं संबोधन उत्तम उदाहरण असल्याचंही म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे नेहमी आमच्या मनात राहतील. महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात आजवरचा सर्वात संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री पाहिला, असंही काही नेटिझन्सनं म्हटलं आहे. तर काहींनी आपल्या मनाविरुद्ध साऱ्या गोष्टी घडत असतानाही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनी लढा दिला. त्यामुळे लढवय्या नेतृत्त्व कसं असावं हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं असल्याचंही म्हटलं जात आहे. 

सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल

मुख्यमंत्रीपद जात असल्याची कल्पना आलेली असली तरी पक्षाची उद्दीष्ट आणि आश्वासनं पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केलेली धडपड याचंही नेटिझन्सना अप्रूप वाटत आहे. यात अखेरच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करुन हिंदुत्व सिद्ध करुन दाखवलं आहे, असंही नेटिझन्स म्हणत आहेत. कॅबिनेट बैठकीत सर्वांचं आभार प्रदर्शन करत अडीच वर्षात काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी देखील उद्धव ठाकरेंनी मागितली. 

दगा झाला...सरकार कोसळलं तरी बंडखोरांना आवाहनआपल्याच माणसांनी बंडखोरी केली आणि त्याचं रुपांतर सरकार कोसळण्यात झालं. एका क्षणात सरकार गेलं. पक्षातील नेते बंडखोरांचा कडक शब्दांत निषेध व्यक्त करू लागले. इतकं सगळं झालेलं असतानाही उद्धव ठाकरेंनी कालच्या फेसबुक लाइव्हमध्येही बंडखोरांना पुन्हा एकदा समोर येऊन चर्चा करण्याबाबत विनंतीपूर्वक आवाहन केलं. याबाबतही नेटिझन्समध्ये उद्धव ठाकरेंबाबत कमालीची सहानुभूती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ