CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाकरे सेनेचे नेते किशनचंद तनवाणी यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला. यावेळी मीडियाशी बोलताना सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह तत्कालीन मविआ सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर दरोडेखोर असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'दरोडेखोर कोण, विकास करणारे की, विकासाचे मारेकरी? ज्यांनी अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडा टाकला, लोकांना अंधारात ढकलले, राज्याला दहा वर्षे मागे नेले, सर्व विकासकामे बंद केली, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो...हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्येदेखील घोटाळे केले. उद्धव ठाकरे आणि मविआने अडीच वर्ष महाराष्ट्रावर दरोडा टाकला,' अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी केली.
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
शिंदे पुढे म्हणतात, आम्ही अडीच वर्षात विकास केला, कल्याणकारी विकास योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली. त्यामुळे दरोडा कोणी टाकला, हे जनतेला माहित आहे. फेक निगेटिव्ह पसरवून मुस्लीम लोकांना घाबरुन महाविकास आघाडीने प्रचार केला. संविधान बदलणार हे सर्व सांगून मुसलमान आणि दलितांना महाविकास आघाडीने फसवले. पण आता लोक हुशार झाले आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम आणि आदिवासींसह सर्वांना आम्ही पैसे देत आहोत, त्यामुळे आमच्यासाठी सर्व समान आहेत.'
संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्काछत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 'मध्य' मतदारसंघातील हिंदू मतांची विभागाणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसापूर्वीच त्यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.